Happy Mother’s Day (Matru Din) Wishes In Marathi 2024 – 12 मे हा दिवस “जागतिक मातृ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आईसाठी ‘मदर्स डे’ ही ती संधी आहे. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’, ‘ईश्वराचे रुप असते आई’ प्रत्येकाला आपल्या आईसाठी ‘मदर्स डे’ हा दिवस स्पेशल बनवायचा असतो. जगातील सर्व नातेसंबंधांमध्ये आईचे नाते हे सर्वात पवित्र आणि सर्वोच्च आहे. आई म्हणजे जी आपल्याला जन्म देते, आई म्हणजे मायेची ऊब, ममता,जिव्हाळा, जखमांवरचं औषध, मैत्रीण, अंगणातली तुळस, देवीचं रुप, यातना, सहनशीलता,समर्पण,आणि बरेच काही. आई मुलांवर संस्कार करते, शिकवते, स्वावलंबनाचे धडे देते; प्रसंगी मुलांसाठी वाटेल ते करायला ती तयार असते.
चला तर मग, मातृदिना निमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास मातृदिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺
Happy Mother’s Day (Matru Din) Wishes In Marathi –
‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’
मातृदिनाच्या शुभेच्छा…!
हंबरूनी वासराला जेव्हा चाटते गाय तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसते माझी माय
मातृदिनाच्या शुभेच्छा…!
“आई म्हणजे माझा जन्म..!
मावशी म्हणजे ‘मी’ झाल्याचा आनंद..!!
आई म्हणजे पुस्तकाची गोड सुरुवात..!
मावशी म्हणजे पुस्तकाचा गोड शेवट
आई म्हणजे विठ्ठल..!
मावशी म्हणजे रखुमाई..!!
आई म्हणजे माझा विश्वास..!
मावशी म्हणजे माझा आशीर्वाद”
अशा आई आणि मावशीला
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा….
“गुतंलेले तुझे हात
नेहमीच व्यस्त असतात कामात,
तुझी अंगाई ऐकावया,
घेऊन येई रात्र,
मातृदिनाच्या शुभेच्छा…”
“जगी माऊलीसारखे कोण आहे
तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे
असे हे ऋण ज्याचे व्याज नाही
या ऋणाविना जीवनास साज नाही
मदर्सडेच्या शुभेच्छा…”
“सगळे दिले मला आयुष्याने,
आता एकच देवाकडे मागणे,
प्रत्येक जन्मी मला
हिच आई मिळो
या पेक्षा अजून काय हवे”
मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा…
“आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम..
तूच माझा पांडुरंग
आई उच्चारानेच होईल सगळ्या वेदनांचा अंत.. “
मातृ दिनाच्या प्रेमळ शुभेच्छा…!
“आई नावाची वाटते देवालाही नवलाई,
विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वत:ला विठाई
मातृ दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा….”