Tulsi Vivah Wishes In Marathi 2024 – हिंदू धर्मशास्त्रात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशी विवाह हा आपल्या संस्कृतीत पवित्रतेचे आणि धार्मिकतेचे प्रतीक मानला जातो. कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर घरोघरी तुळशीविवाह लावला जातो. तुळशीचे औक्षण, सुंदर मांडणी, आणि मंगलमय वातावरण यामुळे या दिवशी भक्तांचे मन प्रसन्न होते. तुळस ही देवी लक्ष्मीचं रूप मानली जाते. विवाहित महिलांनी आज तुळशी विवाह व्रत करावं, असं मानलं जातं. भगवान विष्णूच्या शालिग्राम स्वरुपाची व तुळशीची विवाह पूजा केल्यामुळं अखंड सौभाग्याचं वरदान मिळतं.
तर चला तर मग, तुलसी विवाहानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास तुलसी विवाहाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁
Tulsi Vivah Wishes in Marathi 2024 –
नाते जन्मोजन्मीचे असे आहे हे मंगलमय नाते
तुळसीचे आपल्या सगळ्यांशी असे
तुम्हा सगळ्यांना तुळशी विवाहाच्या शुभेच्छा…!
ज्याच्या अंगणी तुळशीचा वास,
त्याच्या घरात होतो स्वर्गसुखाचा भास
होतं सुखसमृद्धीचं आगमन
जेव्हा होतं शालिग्राम अन् तुळशी मिलन
तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा…!
ऊसाचे मांडव सजवूया आपण,
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामिल,
मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण.
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!
तुळशी विवाहाच्या आनंदाने सारे जमूया एकत्र
मांडव घालून घेऊया या दिवसाचा आनंद
चला वाटूया अक्षता या खास क्षणासाठी
सजवूया तुळशीला लावूनी कुंकूवाचा टिळा मस्तकी
तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा…!
तुळशीविना घराला घरपण नाही
तुळशीविना अगंणाला शोभा नाही
जिच्या असण्याने मिळतो सर्वांना ऑक्सिजन
त्या तुळशीचा विवाह साजरा करुया सर्वजण
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा…!
भिंतींवर सजतील दिव्यांच्या माळा..
संपूर्ण घरात होईल सुंदर सजावट..
तुळशी विवाहच्या निमित्तानं देतो शुभेच्छा
होवो तुमची अखंड भरभराट..
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा…!