Ahilyabai Holkar Punyatithi Wishes in Marathi | अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी विनम्र अभिवादन

Ahilyabai Holkar Punyatithi Wishes In Marathi 2024 – पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारतातील, माळव्याच्या ‘तत्त्वज्ञानी महाराणी’ म्हणून ओळखल्या जातात. भारतातील माळवा राज्यावर राज्य करणाऱ्या निर्भय राणी होत्या. अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी काम केले. धार्मिक सहिष्णुता वाढवण्यात योगदान दिले आणि विविध समुदायांमध्ये एकोपा वाढवणे हा नेहमीच त्यांचा प्रयत्न होता.
चला तर मग, अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Ahilyabai Holkar Punyatithi Wishes in Marathi –

घाट, मंदिरे विहिरी बांधल्या,
समान तिला रंक नि राव,
लोकांसाठी देह झिजवि,
अहिल्याबाई होळकर तिचे नाव।
अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन…!

इंग्रजांनाही दाद न देण्याची
जिद्दच त्यांची न्यारी होती,
राणी असूनही वेगळी जिची छाप होती,
अशी राणी अहिल्याबाई होती..!
अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन…

मधुर होती जिची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा-दाही,
तिच्या उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही. सुखात नांदली आमची जनता,
कारण उत्तम शासन, तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता,
अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन…

लोककल्याणकारी राणी अहिल्या, राज्यकारभारात तरबेज होत्या,
दीन-दुबळ्यांसाठी आईसमान, तत्वज्ञानी अन् कुशल संघटक होत्या.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन…!

close