Bail Pola Wishes in Marathi | बैलपोळाच्या शुभेच्छा

Bail Pola Wishes In Marathi 2024 – श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला वेगवेगळ्या प्रदेशानुसार बैलांचा सण ‘बैलपोळा’ साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. शेतकऱ्यांसाठी शेतात राबून मातीचे सोनं करणारा बैल हा प्रत्येक शेतकऱ्याचा खरा साथी. बैलपोळा हा खास शेतकऱ्यांसाठीचा सण आहे. या दिवशी बैलांकडून कोणतीही काम करुन घेतली जात नाही. तर त्यांना छान नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने शेकले जाते. त्यानंतर बैलांना सजवले जाते. बैलांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झुल घातली जाते. त्यांच्या अंगावर ठिपके काढले जातात. बाशिंग सजवले जाते, गळ्यात कवड्याच्या माळा, घुंगराच्या माळा, पायात चांदीचे तोडे घातले जाते. बैलाला खाण्यासाठी या दिवशी गोडधोड पदार्थ देखील करतात. या दिवशी खास पुरणपोळीचा बेत केला जातो.
चला तर मग, बैलपोळानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास बैलपोळाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁

Bail Pola Wishes in Marathi 2024 –

“गळ्यात कंडा पाठीवरती झूल,
आज तुझाच सण तुझाच मान,
वर्षभर आमचं पोट भराया घेतो त्रास,
आज गोड धोड नैवेद्याचा घे घास,
बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा…”

आला आला रे बैल पोळा
गाव झालं सारं गोळा,
सर्जा राजाला घेऊनी
सारे जाऊया राऊळा,
बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!

आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देनं..
बैला, खरा तुझा सन
शेतकऱ्या तुझं रीन
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

“सण आला आनंदाचा,
माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या माथी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा… !”

“कोसळती श्रावणधारा
धरणिमायही नटली
हिरवाईचा नेसून शालू
नववधूसम भासली
भाव-भक्तिने भरला
आज मनाचा आरसा
पिठोरी अमावस्या
हिंदू संस्कृतीचा वारसा
पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा….”

close