Dahi Handi Wishes In Marathi 2024 – “तुझ्या घरात नाही पाणी..” श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला होता व पहिल्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे.
चला तर मग, दही हंडीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास दही हंडीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉
Dahi Handi Wishes in Marathi 2024 –
खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका,
पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका..
गोविंदा रे गोपाळा..
💐 दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा…! 💐
“तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!🌺”
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट..
तुम्हाला गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा… !
“हातात घेऊनी बासरी आला कृष्ण
थरावर थर रचून झाले मित्र सज्ज
मटकी फोडू, खाऊ लोणी
गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…”
“दह्यात साखर, साखरेत भात
उंच दहीहंडी उभारुन
देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरावर थर
जोशात साजरा करु आज
गोपाळकाल्याचा सण
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा…!”
“जल्लोषात आणि आनंदात
चैतन्याची फोडा हंडी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!”
“फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा…!”