Dasara Wishes In Marathi 2024 – “या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”, हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा सण साजरा केला जातो. ‘दसरा / विजयादशमी’ हा सण साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. दसर्याच्या दिवशी आपट्याच्या पानांच्या रूपात ‘सोनं’ एकमेकांना देऊन हा सण साजरा केला जातो. पौराणिक कथांनुसार, विजयादशमीच्या दिवशी भगवान राम यांनी लंकापती रावण ज्याचे माता सितेचे अपहरण केले त्याचा वध करुन विजय मिळवला, तर दुर्गामातेने नऊ दिवसांच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला होता. तसेच या दिवशी रावणाचा पुतळा तयार करुन त्याचे दहन केले जाते. या व्यतिरिक्त नवरात्रौत्सवाचा अखेरचा दसऱ्याचा दिवस असल्याने देवीचे विसर्जन दसरा झाल्यानंतर केले जाते. रावणाचा पुतळा दहन करताना प्रत्येकजण वाईट गोष्टी आणि विचारांचा अंत करुन चांगल्या आणि सकारात्मक मार्गावर जाण्याचा संकल्प करतात.
तर चला तर मग, दसऱ्यानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास दसऱ्याच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁
Dasara Wishes in Marathi 2024 –
आपट्याची पाने, झेंडुची फुले
घेवूनी आली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी
दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…!
“झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा…”
समृद्धीचे दारी तोरण, आनंदाचा हा दसरा सण,
सोने लुटून हे शिलगण, हर्षाचे उजळू द्या अंगण,
सर्वांना दसरा व विजयदशमीच्या मंगलमय शुभेच्छा….!
दारी झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने,
या वर्षी लुटूयात निरोगी आरोग्याचे सोने!
दसरा, विजयदशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा….!
सोनेरी दिवस, सोनेरी पर्व
सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी
सोन्यासारख्या लोकांना सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…!