Dhantrayodashi Wishes in Marathi | धनत्रयोदशीच्या शुभेच्छा

Dhantrayodashi Wishes In Marathi 2024 – वसूबारस नंतर धनत्रयोदशी येते. अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी म्हणजेच वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करतात. धनत्रयोदशी हा दिवस देवांचा वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. धनत्रयोदशीला काही लोक धनतेरस असंही म्हणतात. या दिवशी लोक घरातील धान्य, वर्षभरातील हिशोबाच्या वह्या, दागदागिने यांची मनोभावे पूजा करतात. या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने घरातील लोकांना आरोग्य आणि सुख लाभते अशी प्रथा आहे. या दिवशी यमापासून कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी यमदीपदान करण्याचीही पद्धत आहे.
तर चला तर मग, धनत्रयोदशीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁

Dhantrayodashi Wishes in Marathi 2024 –

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं सत्सम्वत्सरं दीर्घ मायुरस्तु अमृतमयी मंगलमय हो, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्य लक्ष्मी, शोर्य लक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या दिपावलीत तुमच्यावर लक्ष्मीचा वर्षावर करो.. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो.. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा… !

धनत्रयोदशीचा हा सण, धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन, लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी, तुमची मनोकामना पूर्ण होवो सारी.. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी, कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी, फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी, मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली.. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…

दिव्यांची रोशणाई, फराळाचा गोडवा, अपूर्व असा हा धनत्रयोदशीचा सोहळा.. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

close