Ganesh Chaturthi Wishes in Marathi | गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Ganesh Chaturthi In Marathi 2024 – आला रे आला गणपती आला.., गणपती बाप्पा मोरया, ज्या सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण आला आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाचा जन्म झाला होता. त्यामुळे दरवर्षी गणेश चतुर्थी, भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. 10 दिवसांचा गणेश उत्सव महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात गणेश चतुर्थीपासून सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्दशी तिथीला संपतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक घरोघरी गणेशाच्या मूर्तीची स्थापना करतात आणि त्याची पूजा करतात.
तर चला तर मग, गणेश चतुर्थीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁

Ganesh Chaturthi in Marathi 2024 –

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:|
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा||
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या!
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…

गणपती बाप्पा मोरया..!
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्याला सुख,
समृद्धी आणि यश मिळो अशी मनःपूर्वक शुभेच्छा…

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
लंबोदराचा घरात आहे निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!
गणपती बाप्पा मोरया…!

रम्य ते रूप, सगुण साकार मनी दाटे भाव
पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहीवर
बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा…

मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा….!

गणेश चतुर्थी शुभेच्छा
बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा….

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे..
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

close