Gauri Ganpati Wishes in Marathi | ज्येष्ठ गौरी गणपतीच्या शुभेच्छा

Gauri Ganpati In Marathi 2024 – घरोघरी गौरींच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणपतींच्या पाठोपाठ गौराईचं आगमन होतं. गौरी म्हणजे पार्वती. शिव शंकराची पत्नी माहेरपणाला येते आणि आशिर्वाद देऊन जाते अशी या सणामागील धारणा आहे. गौरी आवाहनानंतर दुसरा दिवस गौरी पूजनाचा असतो. त्यादिवशी रात्रभर सार्‍या माहेरवाशिणी खेळ खेळून सण साजरा करतात आणि तीसऱ्या दिवशी पुढच्या वर्षी पुन्हा या असे सांगून क्षमा प्रार्थना करून गौरीचे विसर्जन करतात.
तर चला तर मग, गौरी गणपतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास गौरी गणपतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁

Gauri Ganpati in Marathi 2024 –

सोन्याच्या पावली गौराई घरी आली,
आगमनाने तिच्या संध्या चैतन्याने न्हाली..!
ज्येष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

सण वर्षाचा आला गं सजलेल्या अंगणी,
उमा पार्वती होऊन आली माहेरची पाहुणी
आली गवर (गौरी) आली आली, सोनपावली आली
आली गवर (गौरी) आली आली, सोनपावली आली!
ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

सोन्या-मोत्यांच्या पावली माझ्या अंगणी आली गं गौराई,
पंचपक्वान्नं, झिम्मा-फुगडी, पूजा-आरतीची करा हो घाई!
गौरीच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी व आरोग्य लाभो हीच प्रार्थना!
ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

गौरी-गणपतीच्या आगमानसाठी सजली संपूर्ण धरणी,
सोन्याच्या पावलांनी गौरी येऊ दे आपल्या घरी,
लाभो आपणास सुख-समृद्धी
होवो आपली प्रगती
ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

लेकी-सुनांची माय माऊली
देईल मायेची सावली,
आली गौराई माहेराला,
भाजी-भाकर द्या गं तिला जेवायला
करा तिची मनोभावे सेवा
ती देईल तुम्हा सुख-समृद्धीचा ठेवा
जेष्ठा गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

close