Happy Friendship Day Wishes in Marathi | मैत्री दिनाच्या शुभेच्छा

Happy Friendship Day Wishes In Marathi 2024 – जगातील सर्व नात्यांच्या पलीकडे असलेलं मैत्रीचं नातं आयुष्यभर साथ देतं. मैत्री एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं. मैत्रीच्या नात्यात कोणतीही बंधन नसतात. मैत्रीचे हे बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कोणालाच कळत नाहीत. आईवडीलांमुळे निर्माण झालेली नाती आपल्याला कुटुंबाकडून मिळतात. प्रेम आणि आपुलकी असलेली रक्ताची ही नाती आपल्याला आयुष्यभर सोबत करतात. पण मैत्रीची नाती काही वेगळीच असतात. ऑगस्टचा पहिला रविवार हा जागतिक मैत्री दिन अथवा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो.
चला तर मग, मैत्री दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Happy Friendship Day Wishes in Marathi –

जीवन आहे तर आठवणी आहेत,
आठवण आहे तर भावना आहेत,
भावना तिथेच आहे जिथे मैत्री आहे..
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणिव,
कारण या नात्याने भरून निघते आयुष्यातील उणीव..
मैत्री दिनाच्या शुभेच्छा…!

मैत्री हसवणारी असावी
मैत्री चिडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी…

जो टीका करतो मात्र मैत्री तुटेल याच्या भितीने सावध राहतो तो तुमचा मित्र नाही – गौतम बुद्ध

मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट असेल तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात – अब्राहम लिंकन

मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत,
स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,
पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र,
दैवानेच लाभतात… – व.पू. काळे

मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज भेट व्हावी
असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री.. – पु. ल. देशपांडे

मैत्री तुझी माझी
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच
हरकत नाही, मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात…

close