Independence Day Wishes In Marathi 2024 – “भारत माता की जय”, भारत माझा देश आहे, असं आपण गर्वाने म्हणत असतो. आपला देशाचा स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी गर्वाचा दिवस आहे. तसंच हा दिवस म्हणजे एकता आणि उत्साहाचा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ भारताला स्वातंत्र्य मिळाले. या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेले स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारक आणि भारतीयांच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
चला तर मग, स्वातंत्र्यदिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺
Independence Day Wishes in Marathi –
“मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा…”
“उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला..
स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा…”
“गर्वाने बोलू भारतीय आहे मी,
देशातील टिकवूनी शांतता,
बदल घडवू, माणूसकी जपू,
आहोत एक आम्ही जरी देशात विविधता
स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…”
“हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा…”
“रंग रूप वेष भाषा जरी अनेक
भारत देशाचे निवासी
सगळे आहेत एक
स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा…”