Kojagiri Purnima Wishes In Marathi 2024 – अश्विन पौर्णिमेला शरद पौर्णिमा अथवा कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्यामुळे चंद्रप्रकाश नेहमीपेक्षा लख्ख आणि जास्त असतो. भारतीय परंपरेत कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मी चंद्रावरून पृथ्वीवर येते आणि कोण जागत आहे ते पाहते असा समज आहे. कोजागिरीला जागरण करत माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. शिवाय चंद्रप्रकाशाचे प्रतिक म्हणून दूधाचे प्राशन केले जाते. चंद्रप्रकाशातील दूध कोजागिरीला पिण्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो हेच कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आहे.
तर चला तर मग, कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁
Kojagiri Purnima Wishes in Marathi 2024 –
शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र, चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र, दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे, आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे.. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
दूध हे केशरी, कोजागिरीचे खास, वेलची-बदाम अन पिस्ते घातले आहेत त्यात, परमेश्वराकडे प्रार्थना आपल्या नात्यात असाच वाढावा गोडवा आणि आयुष्यभर मिळावी आपली साथ.. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा, विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा.. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
कोजागिरी म्हणजे जागरूकता वैभव, उल्हासाचा आणि आणि आनंदाचा उत्सव, शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरूप समन्वयाची अनुभूती.. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो.. हिच आमची मनोकामना.. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!