Mahaparinirvan Din Wishes in Marathi | महापरिनिर्वाण दिनाच्या शुभेच्छा

Mahaparinirvan Din Wishes In Marathi 2024 – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. विशेषत: बौद्ध धर्माचे लोक हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. या दिवशी लोक त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिवे आणि मेणबत्त्या पेटवतात. महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवरही लोकांची गर्दी जमते. या दिवशी बौद्ध भिक्खूंसह अनेक लोक पवित्र गीते गातात आणि बाबा साहेबांच्या घोषणा देतात.
तर चला तर मग, महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास महापरिनिर्वाण दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁

Mahaparinirvan Din Wishes in Marathi 2024 –

विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन…!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन…!

देशात एकता, समता, बंधुता नांदावी
म्हणून आयुष्यभर झटणाऱ्या महामानवाला
महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम…!

प्राणाची आहुती दिली, आमच्या जीवनासाठी
त्रास भोगला किती, आमच्या हसण्यासाठी..
कसे विसरू बाबा तुमचे उपकार,
हा जन्म वाहिला मी फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त,
विनम्र अभिवादन…!

एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी,
गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम…!

महा मानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्य विधाते परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.. कोटी कोटी प्रणाम…!

close