Nag Panchami Wishes in Marathi | नाग पंचमीच्या शुभेच्छा

Nag Panchami Wishes In Marathi 2024 – भारतीय सणसमारंभ हे निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देत असतात. शेतकऱ्याचा मित्र नागदेवताची पूजा करण्याचा आज दिवस. असं म्हणतात नागपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुखरूप आले होते. त्या दिवसापासून श्रावण शुद्ध पंचमीला नागपूजा केली जाते. या दिवशी भारतात नाग अथवा सापाला दूध, फळं, गोडाचे पदार्थ, फुले अर्पण केली जातात. नागपूजा करण्यासाठी नाागाची मातीची प्रतिमा घरात स्थापन केली जाते. सुवासिनी या दिवशी नागाला भावाप्रमाणे मानून त्या दिवशी त्याच्यासाठी उपवास करतात. भगवान शंकराच्या गळात नागाला स्थान असल्यामुळे शंकराच्या मंदिराबाहेर नागपंचमीसाठी भाविक गर्दी करतात.
चला तर मग, नाग पंचमीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Nag Panchami Wishes in Marathi –

नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असावी आणि तुमचे आयुष्य मंगलदायी असावे..
नागपंचमीच्या शुभेच्छा…

हर हर महादेव..
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…

नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला
न्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला..
नागपंचमीच्या शुभेच्छा…!

नागदेवताची मनोभावे पूजा करा तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आरोग्याची बरसात होईल..
नागपंचमीच्या शुभेच्छा…!

रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची,
परी तूच खरा मित्र, पाठ राखीतो बळीराजाची..
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…

दूध लाह्या वाहू नागोबाला, चल गं सखे जाऊ वारूळाला..
नागपंचमीच्या भक्तिमय शुभेच्छा…!

close