Narak Chaturdashi Wishes In Marathi 2024 – दिवाळी हा सण आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या तिथीला नरक चतुर्दशी असेही म्हटले जाते. या दिवशी उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते तर कारीट फोडून नरकासुराचा वध केला जातो. दिपावली हा सण भारतात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी अभ्यंगस्नाना सोबत दिव्यांची आरास, आतेषबाजी, कंदील, फराळ यांसाख्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. दिवाळीचे पाच दिवस महत्त्वाचे असतात. परंतु, या काळात छोटी दिवाळी या दिवसाला अधिक महत्त्व आहे.
तर चला तर मग, नरक चतुर्दशीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁
Narak Chaturdashi Wishes in Marathi 2024 –
नरक चतुर्दशी दिनी,
अभ्यंग स्नान करुनी,
दीप उजाळुनी
आपणास व आपल्या परिवारास
नरकचतुर्दशीच्या व दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा… !
उटण्याचा सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वाट
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा…!
दिवाळीची नवी पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा,
दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन जगी उजळू दे तेजाची दिशा
आपल्या सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा…!
या दिवशी भगवान श्री कृष्णांनी नरकासुराचा वध केला होता.
आपल्या सर्वांच्याही आयुष्यात दुःखरूपी व दुर्गुणरूपी
नरकासुराचा नाश होवो, ही सदिच्छा!”
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा…!
नरक चतुर्दशीच्या सुमुहूर्तावरी आयुष्यात आपुल्या,
नवचैतन्याचे नवकिरण येवो आपल्या दारी..
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा… !
छोटी दिवाळी आपणांस ऐश्वर्य आणि भरभराटीची जावो
आणि तुमच्या घरी आनंद नांदो .
आपल्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा…!