Navratri Wishes in Marathi | नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा

Navratri In Marathi 2024 – “सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते।।” नवरात्र हा देवी दुर्गेच्या उपासनेचा सण आहे, ज्यामध्ये नऊ दिवस देवीचे विविध रूप पूजले जातात. शारदीय नवरात्री प्रमाणे चैत्र नवरात्र देखील नऊ दिवस साजरी करताना काही घरांमध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याची रीत आहे. यावेळेस नऊ विविध धान्यांची बीयाणं रूजवली जातात आणि दशमीच्या दिवशी विसर्जन करतात. नवरात्रोत्सव हा भक्तांसाठी श्रद्धा, भक्ती, आणि नवीन ऊर्जा मिळवण्याचा काळ आहे. या दिवशी देवीच्या कृपेने जीवनात सकारात्मकता, आनंद आणि समृद्धी प्राप्त होण्यासाठी विशेष पूजा आणि उपासना केली जाते.
तर चला तर मग, नवरात्र उत्सवानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁

Navratri in Marathi 2024 –

घटस्थापना
आणि आजपासून सुरू होणाऱ्या
शारदीय नवरात्र उत्सवाच्या
🙏🌻सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!🙏🌻

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा…!

सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणि नमोऽस्तुते।।
🙏🌻 शुभ नवरात्री…! 🙏🌻

नवरात्रीचे नऊ दिवस,
सण हा मांगल्याचा असे..
देवीची नऊ रूपे पाहून,
मन तिच्याच ठायी वसे.
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…!🙏🌻

घटस्थापना घटाची,
नवदुर्गा स्थापनेची..
आतुरता आगमनाची,
आली पहाट नवरात्र उत्सवाची..
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…!🙏🌻

नवरात्री म्हणजे
न – नवचेतना देणारी
व – विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी
🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…!🙏🌻

close