Raksha Bandhan Wishes In Marathi 2024 – ‘ओवाळीते मी भाऊराया.. वेड्या बहिणीची वेडी ही माया’.. बहीण-भावाचा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’ बहीण भावाच्या हाताला राखी बांधून रक्षा करण्याचे वचन भावाकडे मागते. हा साधासुधा दिसणारा दोरा बहीण भावाचे नाते अधिक घट्ट करणारा असतो. श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा हि राखी पौर्णिमा म्हणून हि साजरी केली जाते. रक्षाबंधन हा भावंडांमधील प्रेम, काळजी आणि आदर यांचे एकरूप आणि चिरंतन बंधन साजरे करण्याचा एक शुभ प्रसंग आहे. या दिवशी, बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राख्या बांधतात आणि उत्सव साजरा करण्यासाठी भेटवस्तू आणि मिठाईची देवाणघेवाण करतात.
चला तर मग, रक्षाबंधनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁
Raksha Bandhan Wishes in Marathi –
रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा….
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…! 🎁🎉
राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो …!🎉🎁
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
“आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत
तुझ्यात सामावले आहे माझे विश्व
आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास
हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई…!”🎉🎁
“रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…”🎉🎁
“बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती..
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती..
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा…”🎉🎁
दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे..
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..
🎁🎉रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!🎉🎁