Rang Panchami Wishes In Marathi | रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Rang Panchami Wishes In Marathi 2024 – ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ या सणाला होळी, धुलिवंदन, शिमगा किंवा शिमगोत्सव या नावांनीही संबोधलं जातं. महाराष्ट्रात सर्वच सण-उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे करण्यात येतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन, धूळवड साजरी होते. तर ग्रामीण भागात पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्यात येते. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते, तसेच, फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे.
चला तर मग, रंगपंचमीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास रंगपंचमीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Rang Panchami Wishes In Marathi –

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो..
रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा….

क्षणभर बाजूला सारू रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण..
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…!

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग..
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग..
हि होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो….
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…!

एका बाजूला कृष्ण सावळा,
दुसऱ्या बाजूला राधिका गोरी,
जणूकाही एकमेकांत सामावलेले तो चंद्र आणि ही चकोरी,
होळीच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा..

रंगात होळीच्या रंगूया चला,
स्नेहाच्या तळ्यात डूंबूया चला..
रंग सारे मिसळूया चला,
रंग रंगांचा विसरुया चला..
सोडूनी भेद नी भाव,
विसरुनी दुःखे नी घाव,
प्रेमरंग उधळूया चला…
रंगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा….

वसंत ऋतू फुलला आज साजणीच्या
मनी रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या
अंगणी प्रीतीची वेल फुलली गातो
आम्ही गाणी चिंब भिजू दे
आज रंगपंचमीची राणी
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा….

close