Dhulivandan Wishes In Marathi | धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

Dhulivandan Wishes In Marathi 2024 – ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ या सणाला होळी, धुलिवंदन, शिमगा किंवा शिमगोत्सव या नावांनीही संबोधलं जातं. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते, तसेच, फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा किंवा होलिकोत्सवाचा एक भाग म्हणून फाल्गुन वद्य प्रतिपदेस धुळवड साजरी केली जाते. तेव्हा तेथील राख एकमेकांच्या अंगाला फासून धुळवड खेळून नंतर आंघोळ केली जाते. धुलीवंदनाला एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी करतात.
चला तर मग, धुलीवंदननिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास धुलीवंदनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Dhulivandan Wishes In Marathi –

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

सप्तरंगांची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्यांचा गोडवा
धूलिवंदन निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा….

थंड रंग स्पर्श,
मनी नव हर्ष..
अखंड रंग बंध
जगी सर्व धुंद..
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
होळीच्या अणि धुलीवंदनच्या
हार्दिक शुभेच्छा…!

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
धूलिवंदनाच्या शुभेच्छा…!

गोड धोड खाद्याचा घेऊया आस्वाद,
प्रेम भाव निर्माण करू,
मिटवूया एकमेकातला वाद
खेळूया रंग उधळूया रंग,
तुम्हाला धुळवडीच्या शुभेच्छा…”

close