Shravan Mahina Wishes in Marathi | श्रावण महिन्याच्या शुभेच्छा

Shravan Month Wishes In Marathi 2024 – ‘श्रावणात घननिळा बरसला’, भारतीय सणसमारंभ हे निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देत असतात. सण समारंभ आणि व्रतवैकल्याने श्रावण हा श्रवणभक्तीचा आणि शिवभक्तीचा महिना होय. मंगलमय असा हा श्रावण महिना ज्यामध्ये चातुर्मासातील श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे. श्रावण शुद्ध जरा जिवंतीका पूजन, श्रावण सोमवार व शनिवारचे उपवास, मंगळागौरी पूजन, पंचमी- नागपंचमी, श्रावण पौर्णिमा- रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, श्रावण वद्य अष्टमी- श्रीकृष्ण जयंती, व श्रावण वद्य नवमी- गोपाळकाला असे अनेक सण श्रावण महिन्यात येतात.
चला तर मग, श्रावण महिन्यानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Shravan Month Wishes in Marathi –

शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे
शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे
शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण
फुलाफुलांत उमलला श्रावण..
श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा…!

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे या ओळी श्रावण म्हटला की,
सणांनी भरभरून युक्त असा हा महिना मनात खूपच उल्हास निर्माण करतो.
अशाच या मंगलदायी महिन्याच्या अर्थात श्रावण महिना शुभेच्छा…

कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण
करून ठेवतो कायमची साठवण
असा हा तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका महिना श्रावण…!

येण्याने तुझ्या मन येई मोहरून, देही जाई शहारून
सरींनी या मन होई चिंब चिंब, श्रावण येई असा बरसून
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

हासत – गात, घेऊन सरींची बरसात
आला तो मनमोहक माझा श्रावण महिना
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

close