Vasubaras Wishes in Marathi | वसुबारसच्या शुभेच्छा

Vasubaras Wishes In Marathi 2024 – ”दिन दिन दिवाळी गायी – म्हशी ओवाळी गायी – म्हशी कुणाच्या गायी – म्हशी माझ्या मामाच्या”, वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी या दिवसापासून दिवाळी सुरू होते. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्‍यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. निज अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी आहे, त्यामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे . समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.
तर चला तर मग, वसुबारसनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास वसुबारसच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺🎉🎁

Vasubaras Wishes in Marathi 2024 –

“आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस!
हि दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची
आणि भरभराटीची जावो…”

गाय आणि वासराच्या अंगी असणारी
वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी…
हे सर्व आपणास लाभो..
वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा…

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा…!

सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
या मंगलदिनी घरोघरी यश-समृद्धी, सुख नांदावे
हीच देवाकडे प्रार्थना…

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा…!

“वसुबारस या शब्दातील वसू
म्हणजे धन त्यासाठी
असलेली बारस म्हणजे द्वादशी.
वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…”

“दीन दीन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कुणाच्या,लक्ष्मणाच्या,
लक्ष्मण कुणाचा, आईबापाचा …
दे माई खोबऱ्याची वाटी,
वाघाच्या पाठीत घाली काठी…!
वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना खूप खूप शुभेच्छा…”

close