Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti Wishes In Marathi 2024 – स्वराज रक्षक, मराठा साम्राज्याचे दुसरे शासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते, त्यांची जयंती महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. छत्रपती संभाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी होणार आहे. काही लोक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तारखेनुसारही साजरी करतात. त्यामुळे महाराजांची जयंती एकाच वर्षी दोन वेळा साजरी होते. या दिवशी छत्रपतींच्या शौर्याचे पोवाडे गायले जातात. गड-किल्ल्यांवर उत्सवांचे आयोजन होते. विविध कर्यक्रमांच्या जल्लोषात शंभु राजाच्या स्मृतीस वंदन केले जाते.
चला तर मग, छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti Wishes in Marathi –
प्रौढ प्रताप पुरंदर” “महापराक्रमी रणधुरंदर”
“क्षत्रियकुलावतंस्” “सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज” “श्रीमंत”
श्री छत्रपती संभाजी महाराज की जय!
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…
शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक,
धर्मनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या
छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त शतशः प्रणाम….
मृत्यूलाही मात देईल
असा त्यांचा गनिमी कावा,
झुकले नाही डोळे त्यांचे
असा शिवबाचा छावा.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा….
जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते,
पण सिंहांचा जबडा फाडणारा एकच होता.
स्वराज्याचं धाकलं धनी शंभुराजे
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या मनपुर्वक शुभेच्छा…
व गीते गाती,
ज्याची ओवाळूनी पंचारती
तो एक केवळ ‘संभाजी राजा’
संभाजी महाराज जयंतीच्या मनपुर्वक शुभेच्छा…