Guru Purnima Wishes In Marathi 2024 – “गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥”, हिंदू धर्मात गुरुपौर्णिमा हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आषाढ शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही गुरु पौर्णिमा सण साजरा करण्यात येतो. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. गुरुपौर्णिमेचे महत्त्व गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. या दिवशी शिष्य त्यांच्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या ज्ञान आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात. आपल्या गुरु प्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमाचा सण साजरा करण्यात येतो.
चला तर मग, गुरु पौर्णिमेनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकतात.🌺
Guru Purnima Wishes in Marathi –
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व गुरुंना खूप खूप शुभेच्छा …!
गुरु हाच देव आहे, गुरु हाच श्वास, गुरू हेच सुख, आणि गुरूचाच ध्यास.
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया..
जे जे आपणासी ठावे, ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..
गुरुपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!
अनेक पुस्तकातले धडे गुरुकडुन शिकावे आणि
आयुष्याचे धडे आई-वडिलांकडुन शिकावे,
अनूभवाची शिदोरी अन् मायेची ऊब मिळाली
तेथेचि मज पंढरी घडावी.
गुरुपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!
गुरुविण कोण दाखवील वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम
अवघड डोंगर घाट
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!
ज्यांनी मला घडवलं या
जगात लढायला जगायला शिकवलं
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे..
गुरुपौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!