Gudi Padwa Wishes In Marathi 2024 – हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला, ब्रम्हध्वज आणि विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जाणारा सण आहे. गुढीपाडवा म्हणजे नववर्ष आणि दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. या महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आहे.
चला तर मग, गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺
Gudi Padwa Wishes In Marathi –
नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ,
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…
“चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा..
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा..
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा… !”
“काठी नक्षीदार, वस्त्र रेशमी
लोटा चांदीचा, माळ सुगंधी
उभारतो मराठी मनाची गुढी
साधू संतांची पुण्याई
नांदो सुख समृद्धी दारी
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…”
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!
“जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा
हिंदू संस्कृतीचा, सण उत्साहाचा
मराठी मनाचा, तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. !”
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात..
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा…!
गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव-वर्षाच्या शुभेच्छा…!
नवे वर्ष नवी सुरवात
नव्या यशाची नवी रुजवात
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!