Vat Purnima Wishes in Marathi | वट पौर्णिमेच्या शुभेच्छा

Vat Purnima Wishes In Marathi 2024 – ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. पावसाळा सुरू झाल्यानंतर येणारा पहिलाच सण म्हणजे वटपौर्णमा. महाराष्ट्रीयन महिलांसाठी तर हा दिवस अगदीच खास असतो. अनेक ठिकाणी हा सण साजरा करण्यात येतो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हा उपवास करते आणि वडाची पूजा करून सात जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करते. बाया एकत्र येऊन नवऱ्यासाठी खास उखाणे घेतात, काही बायका खास वटपौर्णिमा निमित्त बनवलेले उखाणे घेऊन नवीन पणा दाखवतात. सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सौभाग्यलंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते.
चला तर मग, वटपौर्णिमेनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Vat Purnima Wishes in Marathi –

लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ
अशीच कायम राहो आपली दृढ साथ..
वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा…!

वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा..!
हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा…!

मंगळसूत्र करून देते आठवण दिलेल्या वचनांची, पाळेन मी सात जन्म आणि देईन तुला साथ..
वटपौर्णिमेच्या हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा…!

वडाप्रमाणे तुझं आयुष्य असो आणि तुझं सुख असचं वडाच्या फांद्याप्रमाणे पसरत जावो..
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

प्रार्थना सौभाग्याची, पूजा वटपौर्णिमेची..!
पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन,
सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचं समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

“वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करते
प्रत्येक जन्मी तुला मागते
वडाला गुंडाळूनी सुताचा धागा
अहो असेच माझ्याशी प्रेमाने वागा,
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा… “

close