Holi Wishes In Marathi 2024 – ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ होळी हा आपल्याकडील एक महत्त्वाचा सण आहे. होळी हा गोडपणा, आपुलकी, राग, मत्सर, द्वेष, आनंद आणि जीवनातील रंगांचा सण आहे. होळीमध्ये लोक आपल्या नाती-परंपरा जपण्याचा, उल्हासाचा, आनंदाचा, जवळच्या नातेवाईक, मित्र, शेजारी आणि जवळच्या व्यक्तींना भेट देतात. तसेच वाईट गोष्टींची या होळीत आहुती दिली जाते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात. या दहनावेळी नैवेद्य म्हणून पुरणपोळी आणि खोबरं यात दहन केलं जातं. तसेच होळी भोवती प्रदक्षीणा घातली जाते. काही ठिकाणी “होळी रे होळी पुरणाची पोळी” असं देखील म्हटलं जातं. नैवेद्य म्हणून टाकलेलं खोबरं प्रसाद म्हणून खाल्ला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. होळी हा सण संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो या सणाला होळी, धुलिवंदन, शिमगा किंवा शिमगोत्सव या नावांनीही संबोधलं जातं.
चला तर मग, होळीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास होळीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺
Holi Wishes In Marathi –
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा… !
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सावाचा साजरा
करू होळी संगे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा….
रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…
“मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…!”
जळो सर्व दोष जळो सर्व ईर्ष्या
चंद्रासारखे असावे मन सुंदर असावे जग
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.. !
“नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा
आनंद घेऊन येई सण हा होळीचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा “
“आली रे आली, होळी आली
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा
मारूया हाळी…
होळी रे होळी, पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…”
‘लाल’ रंग तुमच्या गालांसाठी,
‘काळा’ रंग तुमच्या केसांसाठी,
‘निळा’ रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
‘पिवळा’ रंग तुमच्या हातांसाठी,
‘गुलाबी’ रंग तुमच्या होठांसाठी,
‘पांढरा’ रंग तुमच्या मनासाठी,
‘हिरवा’ रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!
भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…