Maha Shivratri Wishes in Marathi | महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Maha Shivratri Wishes in Marathi 2024 : ||ॐ नमः शिवाय || महाशिवरात्री हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो, हा सण हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहेत. महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा विशेष दिवस मानला जातो. महाशिवरात्री भारताच्या कानाकोपऱ्यात मोठ्या थाटामाटात व उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी शिवभक्त दिवसभर उपवास करतात आणि दर्शनासाठी पहाटे मंदिरात पोहोचतात. या दिवशी मनोभावे शिवशंकराची प्रार्थना केली जाते.
चला तर मग, महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Maha Shivratri Wishes in Marathi –

ॐ नमः शिवाय |
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. !🌿

‘‘ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ||’’
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा …!

हर हर महादेव !
जय जय शिवशंकर ।
महाशिवरात्रीच्या सर्वाना शिवमय शुभेच्छा
🙏। जय भोलेनाथ ।🙏

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
🌿महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..🌿

भोळ्या शंकराची शक्ती, भोळ्या शंकराची भक्ती
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी
आपल्या सर्वांच्या जीवनात
सुख, शांती, ऐश्वर्या लाभो
हीच शंकराकडे प्रार्थना
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

शिव आहे सत्य,
शिव आहे अनंत,
शिव आहे अनाद
शिव आहे भगवंत,
शिव आहे ओमकार,
शिव आहे ब्रह्म,
शिव आहे शक्ती,
शिव आहे भक्ती,
चला शंकराचे करूया नमन
राहो शिवाचा आशीर्वाद आपल्यावर कायम
महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा…!

एक फुल
एक बेलपत्र
एक लोटा जल
वाहू महादेवाला..
वंदन करू सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
हिच प्रार्थना माझ्या भोळ्या शंकराला
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… !

close