Marathi RajBhasha Din Wishes in Marathi | मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Marathi Bhasha Din Wishes in Marathi 2024 – २७ फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज अर्थात कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगादानामुळे महाराष्ट्र शासानाने २१ जानेवारी २०१३ मध्ये या २७ फेब्रुवारी या त्यांच्या वाढदिवसाच्या ऐतिहासिक दिवसाला मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केले. आपल्याला आपल्या मातृभाषेचा आदर आहेच. चला तर मग, मराठी भाषा दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺 आपल्या मराठीचा सार्थ अभिमान!

Marathi RajBhasha Din Wishes in Marathi –

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

माय मराठी! तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

आईचा असे माझ्या एक वेगळाच तालस्वर
प्रेमळ ती लडिवाळ भाषा मराठी सुंदर
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

रुजवू मराठी भाषा
खुलवू मराठी भाषा
जगवू मराठी भाषा
येणा-या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेल
अशी सदैव राहो माझी मराठी भाषा
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,
महाराष्ट्र मराठीला माय मानणाऱ्या सर्वांना
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

close