Nav Vadhu Wedding Marathi Ukhane – आपल्याकडे विविध सण-समारंभ, विविध सोहळे जसे की लग्न समारंभ, बारश्यासाठी, हळदीकुंकू, सत्यनारायण महापूजा, घास भरविणे, डोहाळे जेवण किंवा इतर कोणताही विशेष कार्यक्रम असो यामध्ये प्रामुख्याने एक परंपरा आपल्याला प्रामुख्याने पहावयास मिळते ती म्हणजे नाव घेणे. नाव घे.. नाव घे… लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये मजेशीर परंपरा आहे ती उखाणे घेण्याची. नाव घे म्हणून प्रत्येकीला लग्नानंतर तर सातत्याने आग्रह केला जातो. उखाण्यांची महाराष्ट्रातील परंपरा किती जुनी आहे, याबाबत जरी माहिती नसली तरी आजही उखाणे घेण्याची मजेशीर परंपरा सुरूच आहे. चला तर जाणून घेवूया काही सोपे, मजेदार लक्षात राहतील असे उखाणे.
Nav Vadhu Wedding Marathi Ukhane | वधूसाठी मराठी उखाणे –
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
लग्नमंडपात निनादतात सनईचे सूर,
….. रावां च्या साठी आई वडिलांचे घर केले दूर.
लग्नात लागतात हार आणि तुरे,
……. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान
…… रावांचे नाव घेते राखते तुमचा मान…!
अक्षता पडताच.. अंतरपाट होतो दूर,
…… रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले.. सांगतात सनईचे सूर…!
चालली सप्तपदीचे, सात पावले,
…… रावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधले.
लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास,
…… रावांचे नाव घेण्यास,
आजपासुन करते सुरवात.
संसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर,
आयुष्याचा प्रवास करते …… रावांबरोबर.
नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा,
…… रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा.
ॐ नमोजी आद्या ने ज्ञानेश्वरीची होते सुरुवात,
…… राव आणि माझी जोडी ठेव सुखात.
दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या गाठी,
…… रावांचे नाव घेते, खास तुमच्या आग्रहासाठी.
जाईजुईचा वेल पसरला दाट,
…… रावां बरोबर बांधेल जीवनाची गाठ.
उखाणा घे उखाणा घे, करू नका गलबला,
पूर्वपुण्याईने …… रावां सारखे पती लाभले मला.
सासू सासऱ्यांच्या छायेत, मला नाही काही कमी,
…….. राव हेच माझ्या, सर्वस्वाचे स्वामी.