Ahilyabai Holkar Jayanti Wishes in Marathi | अहिल्याबाई होळकर जयंती शुभेच्छा

Ahilyabai Holkar Jayanti Wishes In Marathi 2024 – पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात झाला. अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी काम केले. धार्मिक सहिष्णुता वाढवण्यात योगदान दिले आणि विविध समुदायांमध्ये एकोपा वाढवणे हा नेहमीच त्यांचा प्रयत्न होता.
चला तर मग, अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास अहिल्याबाई होळकर जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Ahilyabai Holkar Jayanti Wishes in Marathi –

घडविले जे जे आपण, करावे त्याचे रक्षण,
बाणेदारपणे उत्तर देणाऱ्या, अहिल्याबाई ना त्रिवार वंदन
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप अभिवादन…!

घाट, मंदिरे विहिरी बांधल्या,
समान तिला रंक नि राव,
लोकांसाठी देह झिजवि,
अहिल्याबाई होळकर तिचे नाव।
अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…!

लोककल्याणकारी राणी अहिल्या, राज्यकारभारात तरबेज होत्या,
दीन-दुबळ्यांसाठी आईसमान, तत्वज्ञानी अन् कुशल संघटक होत्या.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!

इंग्रजांनाही दाद न देण्याची
जिद्दच त्यांची न्यारी होती,
राणी असूनही वेगळी जिची छाप होती,
अशी राणी अहिल्याबाई होती!!
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा…!

close