Veer Savarkar Jayanti Wishes in Marathi | स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती

Veer Savarkar Jayanti Wishes In Marathi 2024 – “जयोस्तुते जयोस्तुते” या गाण्याचे कवी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती २८ मे रोजी साजरी केली जाते. स्वातंत्र्यासाठी शस्त्र हातात धरण्याशिवाय पर्याय नाही. हे ठासून सांगणारे सावरकर नाशिकसह देशाचं भूषण आहेत. वीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे सेनानी आणि प्रखर राष्ट्रवादी नेते होते. जन्मठेपेची शिक्षा हसतमुखाने स्वीकारणारे सावरकर स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा होते. आजही ते आणि त्यांचे विचार तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. स्वातंत्र्यलढ्यातील नायक, लेखक, थोर स्वातंत्र्यसेनानी, कवी, महान क्रांतिकारक, विचारवंत, ओजस्वी वक्ता आणि दूरदर्शी विनायक दामोदर सावरकरांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन…

Veer Savarkar Jayanti Wishes in Marathi

हिंदूत्त्वाचे धगधगते अग्निकुंड,
अनंत यातना सहन करूनही मातृभूमीसाठी प्राण हातावर घेऊन लढा देणारे क्रांतिवीर,
शौर्यमूर्ती, थोर स्वातंत्र्यसेनानी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!

हे मातृभूमी,
तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या जयंतीच्या दिवशी विनम्र अभिवादन…!

प्रखर राष्ट्रवादी, महान क्रांतिकारक आणि
हिंदू संस्कृती चे जनक स्वातंत्र वीर
“विनायक दामोदर सावरकरजींना
जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम…

उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या जयंतीच्या दिवशी विनम्र अभिवादन…!

अनेक फुले फूलती । फुलोनिया सुकोन जाती ।।
कोणी त्यांची महती गणती ठेविली असे ।।
मात्र अमर होय ती वंशलता । निर्वंश जिचा देशाकरिता ।।
स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या जयंतीच्या दिवशी विनम्र अभिवादन…!

खरे देशभक्त, अनुकरणीय युगद्रष्टा,
अद्वितीय स्वातंत्र्य सेनानी
वीर सावरकर यांच्या जयंती
निमित्त त्यांना त्रिवार अभिवादन…!

राष्ट्रभक्तीची धगधगती ज्वाळा, अखंड हिंदु राष्ट्राचे पुरस्कर्ते,
भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि हिंदुतेजसुर्य
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रनेते, विचारवंत, तत्त्वज्ञ
स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर यांच्या जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन…!

close