Ashadhi Ekadashi Wishes in Marathi | आषाढी एकादशी शुभेच्छा

Ashadhi Ekadashi Wishes In Marathi 2024 – विठुरायाचं वेड आणि पायी वारी हे जगातलं आश्चर्य आहे. देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी यांची पूजा केली जाते. विठू माऊलीला भगवान विष्णु चे अवतार मानले जाते. या दिवशी मोठ्या संख्येने वारीत सामील होऊन अनेक लोक पंढरपूर ला जातात. पंढरपूर ला विठू माऊली चे भव्य मंदिर आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास ठेऊन अनेक लोक विठ्ठलाची आराधना करतात.
चला तर मग, आषाढी एकादशीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Ashadhi Ekadashi Wishes In Marathi –🌺

“पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराज की जय”
हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!🌺

टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीच्या वीणा !
माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला..!
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!

“चैतन्याचा गाभा… विटेवर उभा
पालख्यांचा सोहळा नाही.. वारकऱ्यांचा मेळा नाही
मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान..
पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा
रखूमाईवर उभा विटेवर..
कर कटेवर ठेऊनिया भगवंता,
तव तेज ह्या तिमिरात दे आता”
आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा…!

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!

एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास,
चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी..,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा….!

“जगण्याचं बळ देणारी
विठ्ठला तुझी वारी
यंदा भेट नाही पांडुरंगा”
चंद्र भागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी,
विठ्ठल विठ्ठल जय हरी..!
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा….

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग..
देवशयनी आषाढी, एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

तुझा रे आधार मला, तूच रे पाठीराखा,
तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा,
घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो,
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा..!

रूप पाहता लोचनी, सुख जाले ओ साजणी,
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा,
बहुता सुकृतांची जोडी, म्हणुनी विठ्ठल आवडी,
सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर,
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!

सुखासाठी करिसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एकवेळ,
मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।

close