Maharashtra Din Wishes In Marathi | महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Maharashtra Din Wishes In Marathi 2024 – “जय महाराष्ट्र, गर्जा महाराष्ट्र माझा” असे म्हणतं महाराष्ट्र राज्यात दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन थाटामाटात साजरा केला जातो. १९६० मध्ये महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झाल्याचा हा दिवस साजरा केला आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचे वैभव लक्षात ठेवण्याची आणि राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.
चला तर मग, महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Maharashtra Din Wishes In Marathi –

महान संतांची जन्मभूमी, विज्ञानाने जेथे केली प्रगती प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी हीच आहे आमची संस्कृती. महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. जय महाराष्ट्र…!

बहु असोत सुंदर संपन्न की महा..
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा..
जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
जय महाराष्ट्र…!

आम्हाला अभिमान आहे, महाराष्ट्रीय असल्याचा, आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा, आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा, महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. जय महाराष्ट्र…!

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा…
जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
जय महाराष्ट्र…!

जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी
गुणगुणलो जे गीत गीत मराठी
जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
जय महाराष्ट्र…!

पैठणचे प्रेम अमित देश कोकणा.. पंढरीस ये विदर्भ देवदर्शना ..
अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी… जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
जय महाराष्ट्र…!

गर्जा महाराष्ट्र माझा.. जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा…!
जय महाराष्ट्र…!

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा.. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा…!
जय महाराष्ट्र…!

कपाळी केशरी टिळा लावितो.. महाराष्ट्र देशा तुला वंदितो.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
जय महाराष्ट्र…!

दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा.. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
जय महाराष्ट्र…!

close