Makar Sankranti Wishes In Marathi – मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. मकर संक्रांतीला काही ठिकाणी भोगी, उत्तरायण देखील म्हटलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी व्रत करणं, गंगेत स्नान, कथा वाचन, दान करणे आणि सुर्याची उपासना करण्याला महत्त्व दिलं जातं. मकरसंक्रांतीचा हा सण एकामेकांमध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण करतो. आजच्या या लेखात आपण Makar Sankranti quotes and wishes in Marathi प्राप्त करणार आहोत. या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्य व मित्रमंडळी ला पाठवू शकतात.
ही मकर संक्रांती आनंदाची आणि यशाची, जीवनातील सर्व आनंदांनी भरलेली जावो. तुमची स्वप्ने सत्यात उतरू द्या आणि तुमच्या प्रयत्नांना मोठे यश मिळू द्या. मकर संक्रांतीच्या या शुभदिनी आम्ही तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. तुमचे कुटुंब नेहमी आनंदी आणि आशीर्वादित राहो. देव तुम्हाला हवी असलेली सर्व समृद्धी आणि संपत्ती देवो. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!!
Makar Sankranti Wishes In Marathi
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ..
मैत्रिचा हा नाजुक बंध
नाते आपले राहो अखंड..
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….
तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
कणभर तिळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा..!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
दुःख सारे विसरून जाऊ,
गोड गोड बोलून आनंदाने राहू
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तिळगुळ घेऊन गोडगोड बोला……
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या
गोड गोड मित्रांना “मकर संक्रांतीच्या” गोड गोड शुभेच्छा…..
परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला
मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला…..!
एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
तिळात मिसळला गुळ,
त्याचा केला लाडू,
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
हॅप्पी मकरसंक्रांत….
मकर संक्रांतीच्या या शुभ दिवशी परमेश्वराला प्रार्थना आहे की आपल्या आयुष्यात सुख व प्रचंड आनंद येवो….