Shiv Rajyabhishek Din Wishes in Marathi | शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

Shiv Rajyabhishek Din Wishes In Marathi 2024 – छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा, इतिहासात आजचा दिवस खूप महत्त्वाचा व अभिमानास्पद आहे. याच दिवशी, रायगडी तो सुवर्ण क्षण आला.. न भूतो न भविष्यती असा एक सोहळा रायगडाने अनुभवला.. डोळ्यांचे पारणे फेडणारा तो सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा…! 6 जून हा दिवस संपूर्ण जगभरात शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. 6 जून 1674 रोजी इतिहासाने हा सुवर्णक्षण रायगडी अनुभवला.
चला तर मग, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Shiv Rajyabhishek Din Wishes in Marathi –

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा….

ज्या दिवसाची तमाम शिवभक्त पाहत होते वाट
त्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाट..
रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाट
डोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाट..
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले
रायगडाचे माथे फुलांनी सजले
पाहून सोहळा छत्रपती पदाचा
33 कोटी देवही लाजले..
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास
स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस
त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा रंगला आज खास
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

सूर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता..
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा….

एक होऊनी करू उत्सव
शिवराज्याभिषेक दिनाचा
एक विचाराने चालवू वारसा
अवघ्या महाराष्ट्राचा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

close