Akhaji Wishes In Marathi | आखाजीच्या हार्दिक शुभेच्छा

Akhaji Wishes In Marathi 2024 – आखाजी (अक्षय्य तृतीया) हा भारतातील सर्वात शुभ उत्सवांपैकी एक आहे. वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातील तृतीयेला येणारा ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे ‘आखाजी’ हा महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि प्रिय सण. वैशाख शुक्ल पक्षाची तिसरी तिथी अक्षय तृतीया म्हणून ओळखली जाते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीतयेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेचा सण खान्देशात अगदी दिवाळीसारखाच साजरा केला जातो. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अक्षय्य तृतीयेचा सण अतिशय शुभ मानला जातो आणि या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास ती तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरावर कृपा राहते, असे मानले जाते. या दिवशी शेतकरी बांधव हे आपली शेतीची सर्व कामे बंद ठेवतात.
चला तर मग, आखाजीनिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास आखाजीच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Akhaji Wishes In Marathi –

आखाजी दिवायी सहा महिनानी लाम्हन
भाऊसे पाव्हन मझार दसरा जामिन
धाकला मुराई नको धाडजो
माय बाई आंबानी आमराई
राघो मैनाना जीव भ्याई..
तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी आखाजीच्या हार्दिक शुभेच्छा…

सोन्याचा रथ, चांदीची पालखी,
ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी,
तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी आखाजीच्या हार्दिक शुभेच्छा…

लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो..
आखाजीच्या हार्दिक शुभेच्छा…

घन न घन जसा बरसतो ढग,
तशीच होवो धनाची वर्षा,
मंगलमय होवो हा सण,
भेटवस्तूंची लागो रांग, आखाजीच्या हार्दिक शुभेच्छा…

अक्षय तृतीया आली आहे..
सोबतच आनंद घेऊन आली आहे..
सुख समृद्धी मिळवा..
प्रेमाचा बहार आला आहे..
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला..
आखाजीच्या हार्दिक शुभेच्छा…

close