Akshaya Tritiya Wishes In Marathi | अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा

Akshaya Tritiya Wishes In Marathi 2024 – अक्षय्य तृतीया हा भारतातील सर्वात शुभ उत्सवांपैकी एक आहे. वैशाख शुक्ल पक्षाची तिसरी तिथी अक्षय तृतीया म्हणून ओळखली जाते. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीतयेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेला केलेले प्रत्येक कार्य अक्षय्य फळ देते. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अक्षय्य तृतीयेचा सण अतिशय शुभ मानला जातो आणि या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास ती तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरावर कृपा राहते, असे मानले जाते.
चला तर मग, अक्षय्य तृतीयानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा देऊ शकतात.🌺

Akshaya Tritiya Wishes In Marathi –

“आज अक्षय तृतीया,
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!!
आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख,
धनसंपदा, मैत्री आणि आरोग्य लाभो,
हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!!
माझ्या कडून तुम्हाला,
अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा…!”

“सुवर्ण क्षणांच्या आठवणी,
लक्ष्मी अक्षय्य तृतीयेच्या दिनी,
जीवनदीप जाई उजळुनी,
सुख, समृद्धी लाभो जीवनी,
भक्ती-प्रेमरस ओथंबुनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी,
अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा…”

या शुभ दिवशी सोनं खरेदी करणं आणि परिधान केल्यानं सौभाग्य आणि संपत्ती मिळते, असं मानलं जातं.
या दिनी तुमची भरभराट होवो. अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा…!

या शुभ दिवशी सोनं खरेदी करणं आणि परिधान केल्यानं सौभाग्य आणि संपत्ती मिळते, असं मानलं जातं.
या दिनी तुमची भरभराट होवो. अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा…!

अक्षय हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ “कधीही कमी होत नाही.” असा आहे.
ही अक्षय्य तृतीया तुम्हाला नशीब आणि यश घेऊन येवो. अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा….

“तुमच्या घरात धनाचा पाऊस येवो,
लक्ष्मीचा सदैव वास राहो..
संकटांचा नाश होवो,
आणि शांतीचा वास राहो..
अक्षय्य तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा….”

“अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी,
माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी
सुख, समृद्धी तुमच्या घरात नांदो
अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…”

“प्रत्येक काम होवो पूर्ण..
न काही राहो अपूर्ण..
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..”
अक्षय तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा…!

“आशा आहे या मंगलदिनी,
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो..”
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!

“अक्षय राहो धनसंपदा,
अक्षय राहो शांती..
अक्षय राहो मनामनातील,
प्रेमळ निर्मळ नाती..
अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!”

close