Republic Day Wishes in Marathi 2024 | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic Day Wishes In Marathi – दरवर्षी आपण २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि तेव्हापासून आपण सर्वजण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा आपल्या देशाला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताला स्वतःचे कोणतेही संविधान नव्हते, परंतु नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आणि भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचा हा मसुदा विधान परिषदेत सादर करण्यात आला आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आला, परंतु 26 जानेवारी 1950 रोजी तो लागू झाला. म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे.
चला तर मग, प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या या पवित्र उत्सवात देशप्रेमाच्या रंगात रंगून जाऊ मित्र-परिवारास या खास राष्ट्रीय सणाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Republic Day Wishes In Marathi –

जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे
शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…!

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…!

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या
सर्व भारतीयांना खुप खुप शुभेच्छा…!

स्वप्न सगळेच बघतात, स्वत:साठी इतरांसाठी,
आपण आज एक स्वप्न बघूया,
देशासाठी आपल्या सर्वांसाठी,
सुरक्षित भारत, सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा….

विचारांचं स्वातंत्र्य, विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा..
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया
आपल्या महान राष्ट्राला..
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…!

अतिशय समृद्ध इतिहास आणि
वारसा लाभलेल्या देशात आपण राहतो
आणि या गोष्टीचा अभिमान बाळगतो.
प्रजासत्ताक दिवसाच्या अनेक शुभेच्छा..

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत
तरी सारे भारतीय एक आहेत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

उत्सव तीन रंगांचा
आभाळी आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
ज्यांनी भारत देश घडविला…!
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…!

देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…!

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग
अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारत मातेचे गुण गान
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…!

तनी-मनी बहरुदे नव-जोम
होऊदे पुलकित रोम-रोम
घे तिरंगा हाती
नभी लहरु दे उंच उंच
जयघोष मुखी
जय भारत- जय हिंद, गर्जुदे आसमांत
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा…!

एक देश, एक स्वप्न
एक ओळख, आम्ही भारतीय..
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…!

माझा भारत महान,
भारतीय असण्याचा मला आहे अभिमान
भारताचा प्रजासत्ताक दिन चिरायू होवो
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…!

या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा…!

सुजलाम सुफलाम, मलयज शीतलाम
शस्य श्यामलाम मातरम..
प्रजासत्ताक दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा…!

तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणे किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

close