Shiv Jayanti Wishes in Marathi 2024 | शिव जयंती शुभेच्छा

Shiv Jayanti Wishes In Marathi – अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जिजाऊंच्या पोटी पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख फाल्गुन वद्य तृतीया असल्याने या दिवशी शिवभक्त शिवजयंती हा दिवस साजरा करतात. चला तर मग, शिव जयंती निमित्त तुम्ही Quotes, Messages, व WhatsApp Status द्वारा सोशल मीडियावर खास संदेश पाठवून आपल्या मित्र-परिवारास या खास शिव जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकतात.

Shiv Jayanti Wishes In Marathi –

यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज 🚩

!!प्रौढ प्रताप पुरंधर !!
!! क्षत्रिय कुलावतंस !!
!!सिंहासनाधिश्वर !!
!!महाराजाधिराज !!
!!योगीराज श्रीमंत
!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
!! तमाम शिवभक्तांना !!
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा….

ज्या मातीत जन्मलो तिचा
रंग सावळा आहे.
सह्याद्री असो वा हिमालय,
छाती ठोक सांगतो
मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा…!

अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त
‘मराठी’ रक्तात होती.
जय भवानी जय शिवाजी…

असा एकच राजा मिळाला
महाराष्ट्राच्या मातीला..
मावळा म्हणून शोधले
त्यांनी अठरा पगड जातींना
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरच झाला
तो राजा म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज.
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा….

जेव्हा जेव्हा उठेल बोट स्वराज्यावर रक्त माझे सळसळेल
धडधडते हृदय आणि सळसळते रक्त फक्त जय शिवराय बोलेल..!
शिवजयंतीच्या शुभेच्छा…

चिरून छाती शत्रूची
रक्ताने आम्ही माखले या धरतीला
असेच नाही म्हणत मराठे,
शिवरायांच्या या जातीला….
जय शिवराय

close